तुळजापूर (प्रतिनिधी)- आगामी नगरपरीषद निवडणुकीत स्वच्छ प्रतिमेच्या  व शिक्षीत तरुण तरुणींना उमेदवारीत प्राधान्य  देवुन धनशक्ती विरोधात लढत  देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस (शरदपवारगट) पक्षाची  बैठकीमध्ये  निर्णय घेण्यात  आला.

नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भामध्ये   निवडणूक महाविकास आघाडी स्वबळावर लढवणे याचा निर्णय इच्छुक उमेदवारांची चर्चा करून पुढील रूपरेषा काय ठरवायची यासंदर्भामध्ये जेष्ट कार्यकर्त्याची  एक कमिटी करण्याचे ठरले. त्या कमिटीमध्ये जो निर्णय घेण्यात येईल तो निर्णय पुढील एकमुखाने मान्य होईल असे ठरवण्यात आले. यावेळी पक्षाचे जेष्ट नेते अनिल शिंदे, धनंजय पाटील, दिलीप मगर, तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, शहराध्यक्ष अमर चोपदार, अक्षय परमेश्वर, आकाश शिंदे, वैभव शिंदे, विवेक शिंदे, तोफिक शेख, गणेश ननवरे, शरद जगदाळे, मकसूद शेख, वाहेद शेख, ओंकार चोपदार आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थितीत होते.

 
Top