भूम (प्रतिनिधी)- जळगाव सायकलिस्ट पंढरपूरकडे सायकल वारी करून जात असताना आज भूम शहरात सकाळी दाखल झाले. भूम तालुका पत्रकार संघाच्या वतीने सर्व जळगाव सायकलिस्टचे स्वागत करण्यात आले. यावेळी जळगाव सायकलिस्टचे अध्यक्ष निलेश चौधरी, निलेश भावसार, आरती व्यास, भूपेंद्र व्यास, अजय कानडे यांच्यासह सायकलिस्ट उपस्थित होते.
'एक वारी अशी ही ' जळगाव सायकलिस्टच्या वतीने जळगाव ते पंढरपूर 60 सायकलिस्ट मिळून सायकल स्वारी करून आज पंढरपूर मध्ये पोचणार आहेत. दि. 19 जून रोजी जळगाव येथून जळगाव सायकलिस्ट पंढरपूरच्या दिशेने सायकल वारी करत निघाले आहेत. हे सायकलिस्ट 485 किलोमीटरचा प्रवास करून आज संध्याकाळी पंढरपूर मध्ये दाखल होणार आहेत. जळगाव ते संभाजीनगर (20 जुन) 165 कि मी पहिला मुक्काम. त्यानंतर संभाजीनगर ते मांजरसुंबा 155 (जुन 21) किमी दुसरा मुक्काम, मांजरसुभा ते पंढरपूर 165 पंढरपूर असा 485 किमी चा प्रवास करत जळगाव ते पंढरपूर सायकल वारी
करत पंढरपूर मध्ये दाखल होणार आहेत. जळगाव सायकलिस्ट त्यांच्याकडून पंढरपूरमध्ये विविध कार्यक्रमाचे व प्रभात फेरीचे व गोल रिंगणाचे आयोजन करण्यात आले आहे.
जळगाव ते पंढरपूर सायकल वारी जळगाव सायकलिस्टच्या वतीने करण्यात आली आहे. पंढरपूर येथे ही सायकलिस्ट वारी दाखल झाल्यानंतर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पंढरपूर मध्ये सायकलीच्या वतीने प्रभात फेरी, गोल रिंगण, व वारे विषयी माहिती या सायकल फेरीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
निलेश चौधरी
अध्यक्ष जळगाव सायकलिस्ट