तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे श्री संत गोरोबा काका यांच्या वाड्याच्या 11 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.यावेळी ह.भ.प.दिपक महाराज खरात यांचे प्रवचन संपन्न झाले. यावेळी अशोक सोनवणे ,मोहनराव जगदाळे, ज्ञानेश्वर भागवत, श्यामशेठ राजे, दता डाळजकर, बळवंतराव कुंभार, सतिष दरेकर, विनायक राऊत, संतोष पाषाणकर, विजय देवडे, संजय राजे, सोमनाथ सोनवणे, नागनाथ कुंभार, रामदास कुंभार, महादेव खटावकर व कुंभार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.