परंडा (प्रतिनिधी)- परंडा येथील वैदू समाजातील विद्यार्थीनी भावना शामराज शिंदे बार्शी येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात बी.एएस्सीचे शिक्षण घेत चक्क सोलापूर विद्यापीठात 94 .25 % मार्कस् घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे.
वैदू समाजातून प्राविन्य मिळवणारी भावना शिंदे ठरली. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच निमित्ताने जेष्ठ साहित्यिक तुकाराम गंगावणे यांनी त्यांच्या कार्यालयात भावना शामराज शिंदे हिला पुष्प हार गुच्छ व पुस्तके देऊन सन्मान केला. यावेळी इंजिनियर राहूल बिराजदार, उद्योजक प्रमोद बोराडे, छत्रपती शासन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्राणजित गवंडी , वंचित बहुजन आघाडीचे तालूका अध्यक्ष मोहनदादा बनसोडे, संघटक मधूकर सुरवसे, इंजिनियर रेड्डी, राजेश खंडागळे, रमेश जगता,राजाभाऊ कद ,निरंजन शिंदे आदि हजर होते.भावना शिंदे विद्यापीठात केमेस्टी विषयात प्रथम आल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.