तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील पोलीस कॉर्टर एस.टी. कॉलनी तुळजापूर येथील पंधरा वर्षीय मुलीला तु प्रेम कर व लग्न कर नाही तर सोशल मिडीयावर तुझी बदनामी करेल व  पिस्तुलने मारुन टाकीन अंशी धमकी दिल्याने त्यांचे जाचास व त्रासास कंटाळुन मुलगी सारिका शिकारे हिनी राहत्या जागी दिनांक 31 मे ते 1 जून रोजी आत्महत्या केली. सदर प्रकरणी 10 जून रोजी तुळजापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलिस विभागात काम करणाऱ्या व्यक्ती सारिका शिकारे ही मुलगी आहे.

याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार तुळजापूर शहरातील पोलीस कॉर्टर एस.टी. कॉलनी तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव येथे दिनांक 31 मे व 1 जून मध्यरात्री चार वाजण्याच्या सुमारास सारिका बिजली शिकारे, वय 15 वर्षे, 5 महिने रा. राजेश नगर ढोकी ता. जि. धाराशिव हल्ली मुक्काम पोलीस कॉर्टर एस.टी. कॉलनी तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी  राहत्या घरी ओढणीच्या साह्याने गळफास घेवून आत्महत्या केली. सारिका हीस आरोपी यांनी प्रेम कर व लग्न कर नाहीतर सोशल मिडीयावर बदनामी करेल. माझ्या कडील पिस्तुलने मारुन टाकीन अंशी धमकी दिल्याने त्यांचे जाचास व त्रासास कंटाळुन सारिका शिकारे यांनी आत्महत्या केली.

अशा प्रकारची फिर्याद मयत यांची आई बिजली (निशा) शिकारे यांनी दिनांक 10 जून रोजी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी ओंकार कांबळे, नगिना शशिंकात पांडागळे दोघे रा. कांक्रबा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांच्या विरोधात तुळजापूर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता.कलम- 107,351(3), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे हे करत आहेत. पोलीस कॉन्स्टेबल निशा शिकारे यांची एकुलती एक कन्या असून तिच्या आकस्मिक मृत्यूमुळे खळबळ व्यक्त केली जात आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून न्यायालयात उभे केले असता दोन्ही आरोपींना 13 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.

 
Top