उमरगा (प्रतिनिधी)- जि. प. प्रा.शा.जकेकुर येथे प्रवेशोत्सव उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.  प्रथमतः शालेय परिपाठ झाल्यानंतर गावातून  विद्यार्थ्यांची प्रभात फेरीमध्ये आपली मुले शाळेत पाठवा या घोषणा देऊन फेरी काढण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सुमनताई काळे  अध्यक्षा शाळा व्यवस्थापन समिती, प्रमुख पाहुणे म्हणून शारदाताई चौधरी उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच अनिल बिराजदार, बलसूर केंद्राचे केंद्रप्रमुख गोपीचंद पवार, शिक्षणप्रेमी पालक,शाळेचे मुख्याध्यापक संजय चालुक्य आदि मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशीत झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले.

प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक संजय चालुक्य यांनी केले. बलसूर केंद्राचे केंद्रप्रमुख गोपीचंद पवार, शाळेतील पदवीधर शिक्षक कृष्णा माळी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांना गणवेश व पाठयपुस्तक वाटप करण्यात आले. सर्वांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थाची उपस्थिती होती. याप्रसंगी सरपंच, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षणप्रेमी पालक,अंगणवाडी ताई व शिक्षक वृंद,विद्यार्थी  उपस्थित होते.

 
Top