उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा तालुक्यातील तलमोड येथील श्री.छत्रपती शिवाजी विद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या इ. 8वी च्या विद्यार्थ्याना पाठयपुस्तके वाटप करण्यात आली. सर्व विद्यार्थ्याचे गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले.     

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. उषा (ताई) दिलीप मोरे या होत्या. तर प्रमुख सौ.धनुबाई माधव मोरे सौ.कावेरी परुतप्पा कलशेट्टी श्रीमती सुनंदा वामन येवते आदी उपस्थित होते.      

प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. जे.ए.मोरे सर यांनी केले. सहशिक्षक जाधव जे.जी.यांनी विद्यार्थाना मागदर्शन करून नविन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. 

सुत्रसंचालन श्री.महेश सूर्यवांशी यांनी तर आभार  नितीन राठोड यांनी मांडले. इयत्ता 10 वी वर्गातील यशस्वी विद्यार्थी कु.नेहा तुकाराम मोरे कु.पल्लवी मंगेश गायकवाड चि.प्रतीक बलभीम घोटाळे यांचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला.8 वी विद्यार्थ्यांना वृक्ष देऊन त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  बिराजदार ए.एस.,  वडदरे एन.टी., पाटील, ए.एस., साळूंके पी.बी. यांनी परिश्रम घेतले.

 
Top