भूम (प्रतिनिधी)-  भूम येथील भाजीपाला विक्रेते सुरेश साबळे यांची मुलगी स्नेहा साबळे पोलीस अंमलदार झाली आहे. तिची आई वडिलांसोबत भूम येथील भाजी मार्केटमध्ये वडिलांना भाजीपाला व्यवसायात मदत करतात. सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या पोलीस भरतीमध्ये मुंबई पोलीस पदावर लेखी परीक्षेत 109 मार्क घेत ई डब्ल्यू एस मधून प्रथम येत मुंबई पोलीस म्हणून मुंबई येथे रुजू झाली. त्यानंतर खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे प्रशिक्षणासाठी निवड झाली. 9 महिन्याच्या अथक परिश्रमानंतर लेखी तसेच मैदानी चाचणीत 1320 पैकी 1028 गुण घेऊन तिने पोलीस प्रशिक्षण चाचणी पार पाडली. दिनांक 9 जून रोजी खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे दीक्षांत संचलन पार पडले. स्नेहा ने राष्ट्रसेवीची शपथ घेतली. पहिलाच प्रयत्नात स्नेहा हिने पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण केले. यावेळी ताई मैना सुरेश साबळे, वडील सुरेश प्रताप साबळे, भाऊ शिवराज सुरेश साबळे, शुभम साबळे, अक्षय साबळे, अनिकेत साबळे, दत्ता पन्हाळे,आतराम साबळे उपस्थित होते. आई-वडिलांनी घेतलेल्या कष्टाचे स्नेहाने जिद्दीच्या जोरावर पहिलाच प्रयत्न यश संपादन केले. स्नेहाचे पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न आहे व सध्या ती अभ्यास करत आहे. पोलीस अधिकारी होण्यासाठीचे तिचे स्वप्न पूर्ण होवो.


 
Top