तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील वडगाव देव येथील 56 शेतकऱ्यांना तुमच्या सोयाबीनला जादा भाव मिळवुन देण्याचे अमिष दाखवुन 1,02,09,703 रक्कम न देता फसवणूक केल्या प्रकरणी अणदुर ता. तुळजापूर येथील तीन जणांविरोधात नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या बाबतीत अधिक माहीती अशी कि, स्वप्नील सिद्राम रगबले,सुमित रगबले, खंडु उर्फनळदुर्ग विजयकुमार तम्मा नामणे तिन्ही रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.02.02.2025 रोजी 10.00 वा. सु.वडगाव देव येथील मारुती मंदीराजवळ फिर्यादी नामे-अशोक धुळाप्पा वाघमारे, वय 65 वर्षे, रा.वडगाव देव ता.तुळजापूर जि. धाराशिव यांना व इतर 55 शेतकरी यांना नमुद आरोपींनी संगणमत करुन सोयाबीनला इतर ठिकाणी कमी भाव आहे व आमच्याकडे ओरंगाबाद, पुणे येथील सोयाबीन खरेदी कंपनीशी डायरेक्ट संपर्क आहे त्यामुळे आम्ही सोयाबीनला 4700(4,700) चा भाव देवू असे आमीष दाखवून सोयाबीनची 60 रक्क आता देतो व 40 टक्के रक्कम एक महिन्याने देतो असे सांगून फिर्यादी यांनी विश्वास ठेवून सोयाबीन त्यांना विक्री केले. नमुद आरोपींनी उर्वरीत 40टक्के देण्याचे टाळाटाळा करुन उर्वरित रक्कम 1,02,09,703 (1,02,09,703) ही न देता फसवणुक केली आहे. अशी फिर्यादी -अशोक वाघमारे यांनी दि.23.06.2025रोजी दिलेल्या प्रथक खबरेवरुन पो ठाणे नळदुर्ग येथे भा.न्या.सं.कलम 316(2), 318(4), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.