धाराशिव (प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हे शाखा व धाराशिव शहर पोलिसांनी मोठी कारवाई करीत 50 गाईसह 2 आरोपी ताब्यात घेतले आहेत. या गाई कत्तलसाठी धाराशिव येथे अकलूल येथून आणल्या असून, पोलिसांनी गाई, 2 वाहन व 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे. धाराशिव शहर पोलिस ठाण्यात पुढील कारवाई सुरू आहे.
पोलिसांनी एमएम 12 एआर 9425 व एमएम 45 0927 असे 2 वाहन ताब्यात घेतले असून, त्यात गाईचे पाय, तोंड दोरीने बांधून कोंबण्यात आल्या होत्या. ज्या 2 चालकांना ताब्यात घेतले आहे त्यांना धाराशिव शहरात गाई कुठे सोडायच्या आहेत हे सांगितले होते. त्या व्यक्तीच्या नाव व प्ात्ता सोडले तर या व्यतिरिक्त त्यांना कोणतीही माहिती नसल्याचे ते सांगत आहेत. गोवंश तस्करी करणारी मोठी टोळी धाराशिव शहरात व जिल्ह्यात सक्रीय असून, याचा शोध घेणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान आहे.
पोलिस अधीक्षक रितू खोकर, अपर पोलिस अधीक्षक शफकता आमना, उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार, पोलिस निरीक्षक शकील शेख व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाई पोलिस हवालदार राहुल नाईकवाडी, बळी शिंदे दयानंद गादेकर, चालक घुगे सहभागी होते. पोलिस निरीक्षक शकील शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे.