तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील तामलवाडी येथे महसूल विभागाच्या वतीने दि.23 जुन रोजी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये शेतकरी, निराधार महीला अशा विविध लाभार्थ्यांच्या 365 तक्रारीचे निवारण करण्यात आले.
या शिबिरामध्ये सांगायो श्रावण बाळ डीबीटी मधील एकूण 240 लाभार्थ्यांचे समस्या निराकरण करण्यात आले.पुरवठा विभाग एकूण 110 अर्ज प्राप्त झाले. तसेच पीएम किसान ॲग्री स्टॅग आधार अपडेशन याबाबत नागरिकांच्या निवारण करण्यात आले या शिबीरामध्ये एकूण शेतकरी, निराधार महीला, सामान्य नागरीकांच्या 365 तक्रारींचे निवारण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी तहसीलदार अरविंद बोळंगे, नायब तहसीलदार श्रीमती माजलगावकर अन्न व पुरवठा निरीक्षक कोळगे हे उपस्थित होते. तहसीलदार आरविंद बोळंगे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र व जिवंत सातबारा अभियान अंतर्गत वारसांना सातबारा वितरण करण्यात आले.