उमरगा (प्रतिनिधी)- दिनांक 6 जून 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, उमरगा येथे मोठ्या उत्साहात 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. त्यानिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले.
सर्वप्रथम शिवभक्त सुशांत जाधव व गणेश शिंदे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला. यावेळी उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी, सुरेश दाजी बिराजदार, किरण भैया गायकवाड, शहाजी भैय्या पाटील, आकांक्षाताई चौगुले, सुनंदाताई माने, रेखाताई सुर्यवंशी, लताताई भोसले, पुजाताई सुर्यवंशी, मुरलीधर मुगळीकर, शांतकुमार मोरे, प्रा. व्हि. एम. पाटील, अरुण जगताप, बळीमामा सुरवसे, अर्जुन बिराजदार, किशोर भैय्या शिंदे, रणधीर पवार, सुधाकर पाटील, विजय वाघमारे, हंसराज गायकवाड, संतोष सगर, विजय दळगडे, विशाल कानेकर, इनामदार वकील, दादा गायकवाड, शरद पवार, अजित सुर्यवंशी, विकास दाजी सुर्यवंशी, राहुल शिंदे, अमोल पाटील, दत्ताभाऊ शिंदे, प्रा. सचिन शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण शिंदे, राकेश कोव्हाळे, विशाल शिंदे, बालाजी बिराजदार, शंतनु हळीखेडकर, प्रमोद जाधव, गणेश कटके, अरुण कुंभार,निखिल बिराजदार, लक्ष सुपतगावकर, अंबाजी दूधभाते, सचिन शिंदे, प्रविण वाघदरे, विष्णू पंचमहाल, श्रीकृष्ण रक्तपेढी चे विजय केवडकर, योगेश सोनकांबळे, किशोर खरोसे, ऋतिक मेहेत्रे, राम कांबळे*, यांच्यासह सर्व शिवभक्तांनी सहकार्य केले.