परंडा (प्रतिनिधी)- परंडा येथील शासकीय विश्राम गृह येथे मंगळवार दि.17 रोजी डी.बी.ए.समूहाच्या वतीने 351वी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

यावेळी माननीय डी.बी.ए समूह  संस्थापक अध्यक्ष  दयानंद बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गटाचे ) सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे ,अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष उत्तम शिंदे,महात्मा फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष बिभीषण खुणे, प्रहारचे जिल्हा संपर्क प्रमुख नागनाथ नरोटे,चर्मकार संघटनेचे तालुकाध्यक्ष कानिफनाथ सरपने, ॲडवोकेट दयानंद धेंडे ,यांनी सामुदायिक राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे दीप धूप प्रज्वलन करून पूजा केली.

यावेळी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर  राहुल बनसोडे,दयानंद बनसोडे, ॲडवोकेट दयानंद घेंडे, नागनाथ नरोटे, कानिफनाथ सरपने, दत्तात्रय पाटील,यांनी विचार मांडले  यावेळी  सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस घनश्याम शिंदे, भारत भोसले, धर्मराज नरोटे, संतराम पाटील, अविनाश ओव्हाळ, छगन चौधरी, जेजेराम कांबळे, विकास सोनवणे, समाधान सूर्यवंशी, उत्तम गायकवाड, आदी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.शेवटी उपस्थितांचे आभार प्रदर्शन दयानंद बनसोडे यांनी मानले.


 
Top