भूम (प्रतिनिधी)- वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुजित नायकल यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 17 जून रोजी ग्रामीण रुग्णालय भूम येथे आपत्कालीन परिस्थिती ओढावल्यानंतर काय आणि कोणकोणत्या उपाययोजना कराव्या यासाठी फायर मॉक ड्रिल घेण्यात आले. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील प्रत्येक कर्मचाऱ्याला आपत्कालीन परिस्थितीमध्ये
एखाद्या ठिकाणी आग लागल्यानंतर कशाप्रकारे आगीवर नियंत्रण ठेवायचे याचे कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये फायर मॉक ड्रिल देऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी डॉ. चाकोते मॅडम, डॉ. कुटे, डॉ. वाघमारे मॅडम, मिसाळ सिस्टर, पांचाळ सिस्टर, जुबेर शेख, मुकुंद मुंढे त्याचबरोबर रुग्णालयातील इतर कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.