भूम (प्रतिनिधी)-  भूम तालुक्यातील आंबी येथील अयूब पठाण  यांच्या मेंदू रोग या आजारावरील उपचार भागविण्यासाठी उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांचा मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय कक्ष जिल्हाप्रमुख पांडुरंग धस यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून  ओरिऑन सिटीकेअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल छ. संभाजीनगर येथे एक लाख रुपये उपचारासाठी आर्थिक मदत मंजूर झाली.

पठाण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे हॉस्पिटलचा खर्च परवडणारा नव्हता. उपचार करणे आवश्यक आहे. शिवसेना नेते उपसरपंच सुग्रीव मुरूमकर यांनी जिल्हाप्रमुख पांडुरंग धस यांची भेट घेऊन याबाबत माहिती दिली.पांडुरंग धस यांनी तात्काळ सर्व कागदपत्रे मुख्यमंत्री सहायता निधी मुंबई ऑफिसला पाठवली. व शिवसेना सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते यांच्याकडे सतत फाईल संदर्भात पाठपुरावा केला.

यावेळी संपर्क प्रमुख सचिन मांजरे यांच्या सहकार्याने रुग्णाचा मदतीसाठी तत्काळ सूचना केल्याने या अयूब पठाण रुग्णास मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून एक लाख रुपये मदत मंजूर झाली. याबाबतचे मंजुरी पत्र शिवसेना वैद्यकीय कक्ष जिल्हाप्रमुख पांडुरंग धस यांनी पठाण कुटुंबीयांकडे सुपूर्द केले.

 
Top