तुळजापूर (प्रतिनिध)-  येथील मंजूर असलेले 100 बेड उपजिल्हा रुग्णालयाच्या वाढीसाठी तुळजापुर विकास योजनेतील आरक्षण क्र.42 मधील क्षेत्र 2.54 इतका क्षेत्र शासनामार्फत खरेदी करण्यासाठी मार्गदर्शन व निधी उपलब्धतेबाबत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना दिपक लोंढे यांनी निवेदन दिले आहे. 

ग्रामीण रुग्णालय, तुळजापूर हे सर्व्हे नं.137/1 मध्ये कार्यरत आहे. सदरील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन 100 खाटाचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात आलेले आहे. तुळजापूर हे तिर्थक्षेत्र असल्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांची संख्या व तालुक्यातील तसेच इतर राज्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सध्या रुग्णालयाच्या ताब्यात आलेली जागा अपुरी पडत आहे.

दिपक लोंढे यांनी पालकमंत्री यांच्याशी सविस्तर चर्चा करून निवेदन दिले आहे, याप्रसंगी माजी आमदार ज्ञानराज चौगुले उपस्थित होते.तसेच याविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, विभागीय आयुक्त यांना ही याबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे. याविषयी जुलै 2023 पासून पाठपुरावा करत असून वेळोवेळी निवेदने प्रशासन व राज्यसरकारला दिलेले आहेत.

ग्रामीण रुग्णालय वाढीसाठी आरक्षण क्र.42 असे आरक्षीत केले असल्याचे अवगत करून दर जमिन संपादीत करून दिपक लोंढे यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार चालू बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्यात यावा अथवा सदर जमिनीवरील आरक्षण उठविण्यात येऊन सदर जमीन विकसित करण्यासाठी परवानगी देण्यात यावी असे म्हंटले आहे. 

याबाबत आपण दिनांक 14 ऑगस्ट पर्यंत योग्यतो निर्णय घ्यावा. अन्यथा नाईलाजास्तव उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा देखील दिपकराज हिम्मतराव लोंढे यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.

 
Top