तुळजापूर - येथील नवीन बसस्थानकात बसमध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने महिलेचा गळ्यातील दहा ग्रँम वजनाचे मिनी गंठन चोरुन नेल्याची घटना शुक्रवार दि. 27 जून रोजी दुपारी 01.30 वाजता घडली.

या बाबतीत अधिक माहीती अशि कि अनिता ज्ञानदेव कोळी, वय 50 वर्षे, रा. जनाई मंगल कार्यालयाचे पाठीमागे सांजा ता. जि. धाराशिव या दि. 27 जून रोजी 01.30 वाजण्याच्या सुमारास नविन बसस्थानक तुळजापूर येथे बस मध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने अनिता कोळी यांचे गळ्यातील 10 ग्रॅम वजनाचे मिनी गंठण गर्दीचा फायदा घेवून चोरुन नेले अशी फिर्याद अनिता कोळी यांनी दि.28 जून 2025 रोजी दिल्यावरुन तुळजापूर पोलिस ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
Top