धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील ठाकरे नगर नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने महिलांसाठी तीर्थक्षेत्र दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाच्या आधारस्तंभ श्यामलताई साळुंके यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे मार्गदर्शक प्रशांत साळुंके यांनी दिली.
ठाकरे नगर नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी महिलांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात येतात. विशेषत: नवरात्र महोत्सवात धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक प्रबोधनाचे कार्य हे मंडळ करत आहे. विशेष म्हणजे या नवरात्र महोत्सव मंडळाच्या कार्यकारिणीत सर्व महिलांचा समावेश असतो. या महिलांना तीर्थक्षेत्र दर्शनाची संधी मिळावी यासाठी दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि. 11 मे रोजी पहाटे तीन वाजता ठाकरे नगर येथून ही तीर्थक्षेत्र दर्शन सहल मार्गस्थ होईल. या दर्शन सहलीकरिता दोन बसची व्यवस्था करण्यात आली असून मंडळातील एकुण 92 महिला यात सहभागी होणार आहेत. दोन दिवसांची ही दर्शन सहल असणार आहे.
या तीर्थक्षेत्राच्या दर्शनाचा लाभ ठाकरे नगर नवरात्र महोत्सव मंडळाच्या या दर्शन सहलीत तीर्थक्षेत्र आदमापूर येथील संत बाळू मामा देवस्थान, साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्णपीठ असलेली श्री महालक्ष्मी, क्ष्रीक्षेत्र ज्योतिबा, नृसिंहवाडी देवस्थानच्या दर्शनाचा लाभ महिलांना मिळणार असल्याचे मंडळाचे मार्गदर्शक प्रशांत साळुंके यांनी सांगितले.