कळंब (प्रतिनिधी)-बोरगाव (ध) येथे शिवसेनेच्या नवीन शाखेचे उद्घाटन मोठ्या जल्लोषात व उत्साही वातावरणात संपन्न झाले. या शाखा उदघाटनाचे आयोजन श्री. सुशील चोरघडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमास ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला असून, गावात एक सकारात्मक उर्जेचे वातावरण निर्माण झाले होते.
उद्घाटनप्रसंगी प्रमुख उदघाटक म्हणून अजित पिंगळे यांनी उपस्थित राहून शाखेचे उद्घाटन केले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “शिवसेना ही सामान्य माणसांच्या हक्कासाठी लढणारी पक्षसंघटना असून, ग्रामीण भागात पक्षाचे कार्य अधिक प्रभावीपणे पोहोचण्यासाठी अशा शाखांचा विस्तार अत्यंत आवश्यक आहे. या कार्यक्रमाला लक्ष्मीकांत हुलजुते (तालुका प्रमुख, शिवसेना), अनंत (बाबा) लंगडे यांनी विशेष उपस्थिती दर्शवून नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या व पुढील कार्यासाठी प्रोत्साहन दिले.
शाखेची नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे: शाखा प्रमुख: अमोल चोरघडे, शाखा उपप्रमुख: सचिन चोरघडे, शाखा कार्यध्यक्ष: मनोहर सांगळे, शाखा कोषाध्यक्ष: अतुल जाधव, शाखा सचिव: गजानन पाटील, शाखा महासचिव: बालाजी सांगळे, शाखा संघटक: अशोक चोरघडे, रणजीत चोरघडे.
उद्घाटन प्रसंगी बोलताना अमोल चोरघडे यांनी सांगितले की, “बोरगाव (ध) येथील जनता शिवसेनेवर पूर्ण विश्वास ठेवते. येथील स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी आणि सामाजिक कार्याला चालना देण्यासाठी ही शिवसेनेची ही शाखा कटिबद्ध राहील. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व नियोजन स्थानिक कार्यकर्त्यांनी मनापासून केले होते. या प्रसंगी मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ, युवक, शिवसैनिक व शिवसेना समर्थक उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल सुशील चोरघडे यांचे व सर्व मान्यवरांचे आभार मानले.
शिवसेनेच्या या नवीन शाखेच्या स्थापनेमुळे बोरगाव (ध) परिसरात पक्षाची घडी अधिक बळकट होणार असून, स्थानिक पातळीवर विकासकामे, जनतेच्या समस्या आणि सामाजिक उपक्रम अधिक प्रभावीपणे हाताळले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.