तुळजापूर( प्रतिनिधी)- जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तुळजापूर शहरातील मुस्लिम समाजाने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथील मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन मा. तहसीलदार मार्फत पंतप्रधानांना निवेदन सादर केले.

या निवेदनात त्यांनी नमूद केले की, "हा हल्ला शांततामय काश्मीर आणि भारताच्या एकात्मतेवर झालेला हल्ला आहे. अशा निंदनीय कृत्याच्या जबाबदारांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, जेणेकरून देशातील नागरिकांचा विश्वास कायम राहील."

प्रतिनिधींनी सरकारकडे मागणी केली आहे की, या कृत्यामागील अतिरेक्यांना शोधून काढावे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करावेत.

यावेळी मौलाना मुफ्ती फिरदोस, हाफिज इब्राहिम पटवेकर, हाजी जावेद बागवान, फेरोज पठाण, अयाज पठाण, आरिफ शेख, रईस सिद्दीकी, शब्बीर पठाण, रफिक शेख, इमरान बागवान, हकीम शेख, अमीन नदाफ, शाहिद शेख, आरिफ बागवान, युसूफ शेख, सलीम सय्यद, समीर शेख, विखार सिद्दीकी, सिद्दीक पटेल या प्रमुख व्यक्तींसह मुस्लिम समाजाचे शेकडो बांधव उपस्थित होते. त्यांनी एकात्मतेचा संदेश देत देशासोबत खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका स्पष्ट केली.

 

 
Top