धाराशिव (प्रतिनिधी)- जम्मू-कश्मीर येथील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्यामध्ये 28 निरापराध नागरीक मारले गेले त्याच्या निषेधार्थ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने दि.01.05.2025 रोजी जिल्हा बैठकीमध्ये निषेध व्यक्त करुन अतिरेक्यांच्या हल्यात मरण पावलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पाकिस्तानचा धिक्कार करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगांवकर, जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र बिराजदार जिल्हा चिटणीस मुस्ताक हुसेनी, ओबीसी जिल्हाध्यक्ष बालाजी डोंगे, वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.ताडेकर, डॉ.मोहन बाबरे, ॲङप्रविण शिंदे,इकबाल पटेल, गणपत चव्हाण, नंदकुमार जाधव, अनिल जाधव, शामसुंदर पाटील, पंडीत घाटगे, बाळासाहेब कसबे, चंद्रकांत पाटील, उत्तरेश्वर धाबेकर, शिरीष धाबेकर, नाना कसबे, अक्षय धाबेकर, राहुल धाबेकर, गणेश धाबेकर, बाळू वडगणे, यांच्यासह आदी जिल्ह्यातील पक्ष पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.