भुम (प्रतिनिधी )- परंडा तालुक्यातील कुंभेफळ येथील तानाजी नाईकोडे यांना उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 50 हजार रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले
परंडा तालुक्यातील कुंभेफळ येथील तानाजी नायकोडे यांना मेंदूचा आजार असल्याने डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला ऑपरेशन करणे अत्यंत गरजेचे होते नायकोडे यांची परिस्थिती गंभीर असल्याने ऑपरेशनचा खर्च मोठा होता. अशावेळी त्यांचे बंधू गणेश नायकोडे यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जनसंपर्क कार्यालय भूम येथे तालुकाप्रमुख पांडुरंग धस यांची भेट घेऊन आजाराची सविस्तर माहिती सांगितली व धस यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी फाईल तयार करून तात्काळ मंजुरीसाठी पाठवली व सतत पाठपुरावा केला.
यावेळी
उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, परिवहनमंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक,माजी मंत्री तथा आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत,व खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे,यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक,मा.उपाध्यक्ष धनंजय सावंत, कक्षप्रमुख मंगेश चिवटे,राज्यप्रमुख रामहरी राऊत, शिवसेना वैद्यकीय संपर्कप्रमुख सचिन मांजरे पाटील, वैद्यकीय अधिकारी रवींद्र अनभुले यांच्या पुढाकाराने रुग्ण तानाजी नायकोडे रुग्णास 50 हजार रुपये भगवंत हॉस्पिटल बार्शी येथे मंजूर करण्यात आले. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जनसंपर्क कार्यालय भूम येथे गणेश नायकोडे यांच्याकडे नुकतेच मंजुरी पत्र देण्यात आले.दरम्यान नायकोडे कुटुंबीयांनी सर्व टीमचे आभार व्यक्त केले.
धाराशिव जिल्ह्यातील रुग्णांसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या माध्यमातून चालू केलेली रुग्णसेवीची वारी अखंड सुरूच राहणार - पांडुरंग धस