तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ उन्हाळा सुट्यांच्या पार्श्वभूमीवर भाविक मोठ्या संखेने खाजगी वाहनांनी येणार असल्याचे माहीत असताना वाहतूक नियोजन करणे गरजेचे होते. ते न केल्याने याचा ञास भाविकांचाच वाहनांना भोगावा लागत आहे. वाहतूक नियोजनाचा तुळजापूर शहरात बोजवारा उडाला असून, पोलिस मात्र ऑनलाईन दंड करण्यात व्यस्त आहेत.
छञपती शिवाजी महाराज पुतळापासुन जिल्हा परीषद शाळेमार्ग घाटशिळ वाहन तळात वाहने सोडणे व वाहनतळ ते दिपक चौक मार्ग बाहेर काढणे गरजेचे असताना ते न केल्याने दिपक चौक, घाटशिळ रोड वर ये-जा करणारे वाहने एकाच रोडवर एकञ येत असल्यामुळे येथे वाहतुक कोंडी होवुन याचा ञास पायी चालणाऱ्या भाविकांना होत होता. तसेच शुक्रवार पेठ, कमानवेस, पावणारा गणपती चौक, आर्य चौक या भागात वाहतूक कोंडी होवून याचा भाविकांना त्रास झाला. वाहतुक पोलिस येवुन नो पार्कींग झोन मध्ये उभ्या केलेल्या वाहनावर आँनलाईन दंड टाकुन निघुन जात होते. वाहनेच जर दिपक चौक, भवानी रोडवर सोडले नसते तर भाविकांनी वाहनतळात वाहने लावुन गेले असते. माञ वाहने नो पार्कींग झोन मध्ये सोडायाचे व नंतर येवुन आँनलाईन दंड फाडायाचा हा आगळा वेगळा प्रकार शहरातील वाहतुक बाबतीत चालु असल्याने या बाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालणे गरजेचे बनले आहे.