धाराशिव (प्रतिनिधी)- येथे तुळजाभवानी क्रीडा संकुलतात पार पडलेल्या भारतीय म्युझिकल चेअर रोलर स्केटिंग स्पर्धेत श्रीपतराव भोसले हायस्कूलची इयत्ता सातवीत शिकणारी आर्फिया पटेल हिने राज्यस्तरीय स्पर्धेत चार सुवर्णपदक पटकावले.
या तिच्या यशाबद्दल आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील, सरचिटणीस प्रेमा सुधीर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील , प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याधापक प्रमोद कदम, सातवीचे पर्यवेक्षक राजेंद्र जाधव, विवेक कापसे, एस ए. राठोड, एस.के. वाघमारे, जारवाल, अमित लोमटे यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.