तुळजापूर (प्रतिनिधी)- शुक्रवार दि. 2 मे 2025 रोजी सकाळी 7 वाजता श्री केदारनाथ मंदिराचा दरवाजा जंगम वीरशैव परंपरेतील केदार पिठाचे जगद्गुरू श्री श्री श्री 1008 भीमाशंकर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभ हस्ते उघडण्यात आले. पारंपारिक पध्दतीने वैदिक मंत्रोच्चार मध्ये केदारेश्वर बाबांचे पूजन करून केदारनाथ यात्रेला आरंभ झाला. केदारनाथ मंदीर खुले होताच केदारनाथ दर्शनार्थ भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.
उत्तराखंड येथील केदारनाथ मंदिर शुक्रवारी (दि.2) दर्शनासाठी भाविकांकरीता खुले करण्यात आले आहे. परंतु, या जगप्रसिद्ध मंदिराचे धाराशिव जिल्ह्याशी नाते असून तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक येथील वैराग्यधामचे अध्यक्ष भीमाशंकर लिंग शिवाचार्य स्वामीजींनी शुक्रवारी धार्मिक विधी केल्यानंतर या मंदिराचे कपाट (दरवाजा) उघडून भाविकांना दर्शन घेण्यासाठी खुला करण्यात आला आहे. केदारनाथ मंदिर पुढील सहा महिने भाविकांसाठी दर्शनाकरीता खुले राहणार असल्याची माहीतीही प्रकुल्लकुमार शेटे यांनी दिली आहे.