धाराशिव (प्रतिनिधी)-  राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक समिती धाराशिव च्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांचा 103 व्या स्मृतिदिनानिमित्त 6 मे 2025 रोजी ध्वजास वंदन केले. शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून गुलापुष्प वाहण्यात आली.

 यावेळी विक्रम पाटील,पृथ्वीराज चिलवंत, बालाजी तांबे यांनी शाहू महाराजांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. या अभिवादन कार्यक्रमास राजर्षी शाहू महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष बलराज रणदिवे, संदीप इंगळे, विजयकुमार गायकवाड, रघुनाथ गायकवाड, सतीश घोडेराव, कुणाल निंबाळकर,रोहित पडवळ, राजसिंह राजेनिंबाळकर, मुकुंद घाडगे, सिद्धार्थ बनसोडे,सुशील गडकर, स्वराज जानराव, आकाश मुंडे,ऋषिकेश शिंदे,सचिन लोंढे, अमोल पाटील, यासेर बिराजदार,प्रशांत सावंत, संदीप शिंदे,दत्तात्रय वीर,अमजद सय्यद,महादेव घायतिडक आदीसह अनेक जण उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजर्षी  शाहू महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष बलराज रणदिवे यांनी तर सूत्रसंचालन सचिव बालाजी तांबे यांनी केले. शेवटी उपस्थित आमचे आभार पृथ्वीराज चिलवंत यांनी मानले.

 
Top