धाराशिव (प्रतिनिधी)-  गेल्या काही वर्षांपासून गल्लीपासून ते मुंबईपर्यंत सत्तेत असलेल्या उबाठा गटाच्या दुर्लक्षामुळे शहरातील कचरा डेपोचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. मात्र, भारतीय जनता पार्टी व भाजयुमोने 16 डिसेंबर 2021 पासून सातत्याने या प्रश्नावर आवाज उठवत आंदोलनांची मालिका राबवली होती.

कचरा डेपोच्या आडून नगर परिषदेमध्ये होणाऱ्या आर्थिक अपहाराबाबत तात्काळ चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी भाजप व युवा मोर्चाने वेळोवेळी आंदोलन केले. कधी नगर परिषदेसमोर कचऱ्याची होळी करून, तर कधी जोरदार घोषणाबाजी करून तत्कालीन सत्ताधाऱ्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्यावेळी नगर परिषदेत व शहराच्या सत्ता केंद्रात असलेला उबाठा गट रस्ते, भुयारी गटार व इतर कामातील टक्केवारीचे पैसे मोजत बसला. विशेष म्हणजे त्यांच्या गटाचे प्रमुख स्वतः मुख्यमंत्री असताना देखील शहराच्या विकासाचे प्रश्न दुर्लक्षितच राहिले.

उबाठा गटाच्या रंगा बिल्लाने क्रेडिड चोरण्यासारखे खालच्या पातळीचे राजकारण करण्याऐवजी आपला राहिलेला पक्ष वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यांच्या दुटप्पी धोरणांना कंटाळून अनेक कार्यकर्ते आता उबाठा गट सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत  आणि आणखीही अनेक जण वाटेत आहेत.

भारतीय जनता पार्टीने केलेल्या सातत्यपूर्ण लढ्यामुळे कचरा डेपो चा प्रश्न लवकरच मार्गी लागेल अशी अपेक्षा नाहीतर खात्री आहे.

आमदार राणादादा यांच्या अथक प्रयत्नातून धाराशिव जिल्ह्यात जो विकासात्मक रथ चालू आहे तो कोणी कितीही हाणून पाडायचा प्रयत्न केला तरी आता थांबणार नाही. 

राजसिंहा राजेनिंबाळकर 

 जिल्हाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा धाराशिव

 
Top