मुरूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या फेब्रुवारी ,मार्च 2025 मध्ये एस. एस. सी.परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेचा निकाल दिनांक 13- 5- 2025 रोजी लागला आहे. या परीक्षेमध्ये विद्यालयाचा100% निकाल लागला आहे. सतत तीन वर्षे शंभर टक्के निकालाची हॅट्री करण्यात आली आहे. विद्यालयातील 10 विद्यार्थी विशेष प्राविण्य असे उत्तीर्ण झाले आहेत. 15 विद्यार्थी विषय प्रथम श्रेणीत पास झाले आहेत. द्वितीय श्रेणीत4 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रशाल्यातून प्रथम येण्याचा मान कुमारी सानिया वजीर मुल्ला 86.60 द्वितीय क्रमांक कुमारी लक्ष्मी राजेंद्र जामगे 86.00 तृतीय क्रमांक कुमारी बनसोडे श्रुती तानाजी 85.20 या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन माजी मंत्री बसवराज पाटील ,संस्थेचे अध्यक्ष बापूराव पाटील, युवा नेते शरण पाटील, संस्थेची सचिव व्यंकट जाधव गुरुजी, शाळेचे मुख्याध्यापक तात्यासाहेब शिंदे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.