धाराशिव (प्रतिनिधी)-जागतिक नर्सिंग दिन जिल्हा शासकीय सर्वसामान्य रुग्णालय धाराशिव येथे साजरा करण्यात आला.
फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. अग्रगण्य परिचारिका,लेखक व संख्या शास्त्रज्ञ असलेल्या फ्लोरेन्स नाइटिंगेल यांनी इ.स.1853 साली झालेल्या क्राइमियन युद्ध दरम्यान जखमी सैनिकांची सुश्रुषा केल्याबद्दल त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांना “लेडी विथ द लॅम्प“ असेही म्हणतात. या दिनाचे औचित्य साधुन मधुन पुढील उच्च शिक्षणासाठी पाठवण्यात आलेल्या परिचारिकांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर,रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ,गणेश वाघमारे,तसेच आरोग्य मित्र रौफ शेख यांच्या वतीने विशेष सन्मान देण्यात आला. ज्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचा सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान करुन त्यांच्या मेहनतीचा गौरव करण्यात आला.या उपक्रमामुळे परिचारिकांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगतीला प्रोत्साहन मिळाले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देत परिचारिकांच्या शिक्षणासाठी रुग्णालयाने उचललेल्या पावलांचे कौतुक केले. हा दिवस परिचारिकांच्या मेहनतीला ओळख देणारा आणि त्यांना अधिक प्रोत्साहित करणारा ठरला.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय चाकुरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ तानाजी लाकाळ, शासकीय महिला रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षका डॉ स्मिताताई गवळी, डॉ.फुलारी,नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य मुजावर,रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ, तालुकास्तरीय बाल संरक्षण समिती तथा इथिकल कमिटी सदस्य गणेश वाघमारे,आरोग्य मित्र रऊफ शेख, अधिसेविका सुमित्रा गोरे,सुवर्णा देशमुख,सुरेखा गवई,संगिता फड,सह इतर उपस्थित होते.