धाराशिव (प्रतिनिधी)-  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रि जन्मशताब्दी वर्षानिमित्त भारतभर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यांचे महान कार्य घरोघरी पोहचविण्याचे कार्य यानिमित्ताने करण्यात येणार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर 300 वी जयंती समारोह जिल्हा समितीचे संयोजक इंद्रजित देवकते यांनी सांगितले. 

या समितीमध्ये सहसंयोजकपदी भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, सदस्यपदी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष नंदाताई पुनगुडे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष दादासाहेब घोडके, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय सोनटक्के यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे भाजपा नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटिल, नितीन काळे, नेताजी पाटील सतीश दंडनाईक व इतर पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे.


चित्ररथ, शोभायात्रा काढणार

यानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या धाराशिव कार्यालयात झालेल्या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती समारोहानिमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. जयंती समारोहात 21 ते 30 मे या कालावधीत अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील चित्ररथ, शोभायात्रा, महिला मेळावे, युवा मेळावे, पथनाट्य, वक्तृत्व व निबंध स्पर्धा, अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर प्रभावित होऊन सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचे व सोशल मीडियावरील प्रभावी आहे. व्यक्तींचे संमेलन, अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील प्रदर्शन असे कार्यक्रम होणार असल्याची माहिती यावेळी संयोजक इंद्रजित देवकते यांनी दिली.

 
Top