धाराशिव (प्रतिनिधी)-  नेट सेट परीक्षेचे कुलूप उघडण्यासाठी योग्य चावीचा वापर केल्यास आपण यशस्वी होतो. असे प्रतिपादन प्राध्यापक डॉ.मारुती लोंढे यांनी केले.

परांडा येथील श्री शिवाजी महाविद्यालयात आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत साधन व्यक्ती म्हणून ते बोलत होते. नेट सेटचा अभ्यास करण्यासाठी प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रमाचे विश्लेषण करणे अत्यावश्यक आहे असेही ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तुकाराम लोखंडे यांनी केले.यावेळी ते म्हणाले की, या महाविद्यालयात विविध कार्यशाळेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा नेटसेट आणि इतर स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले जाते.याचा उपयोग परंडा परिसरातील विद्यार्थ्यांनी नेहमीच घेतला पाहिजे असे देखील ते यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष शिवमती सौ.आशाताई मोरजकर या होत्या. प्रमुख उपस्थितीमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ.तुकाराम लोखंडे हे होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शक्तीराज माने यांनी केले तर आभार प्रा.आयशा शेख यांनी मानले. यावेळी प्रा.राजश्री टिपाले, प्रा. अश्विनी जोगी आदीसह मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तुकाराम लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

 
Top