धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या स्वागतासाठी आयोजित कार्यशाळेला धाराशिव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत विविध उपक्रमांची रूपरेषा ठरवण्यात आली. कार्यशाळेच्या सुरुवातीला दत्ता कुलकर्णी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, नेताजी पाटील, अस्मिता कांबळे, सतीश दंडनाईक, युवा मोर्चा अध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, नितीन भोसले, इंद्रजित देवकते, नंदा पुनगुडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यशाळेची प्रस्तावना इंद्रजित देवकते यांनी मांडली. तर सूत्रसंचालन राजसिंह राजेनिंबाळकर यांनी केले. माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी दत्ता कुलकर्णी यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. दरम्यान कार्यक्रमात सोमनाथ लांडगे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याविषयी विचार मांडले.
55 जि. प.सदस्य व 8 नगराध्यक्ष भाजपचे होतील
दत्ता कुलकर्णी यांनी राजमाता अहिल्यादेवी यांचे कार्य आम्हा सर्वांसाठी आदर्श व प्रेरणादायी असल्याचे सांगितले. यावेळी पक्ष बांधणी बद्दल बोलताना भाजप देव, देश, धर्म आणि कार्यकर्त्यांच्या हितासाठी काम करतो. भविष्यात 55 जिल्हा परिषद गट, 8 नगराध्यक्ष, पंचायत समित्या, चार विधानसभा मतदारसंघ आणि खासदार देखील भाजपचे होतील. असे काम करण्याच्या निश्चय केला. हे काम करण्यासाठी “पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर तसेच माजी आमदार बसवराज पाटील हे आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहेत असा विश्वास दिला. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी कधीही अडीअडचणीच्या वेळी नव्या सूचनां देण्यासाठी संपर्क करावा, आपण कुटुंब म्हणून काम करू असे सांगितले.