भूम (प्रतिनिधी)- भूम येथील जि. प. प्रशालेचा इयत्ता दहावी परीक्षा देऊन शाळा सोडल्यानंतर तब्बल 28 वर्षांने या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी अनेक वर्षांनंतर जुन्या आठवणींचा आनंददायी उजाळा मिळाला.
भूम जि.प. प्रशालेतील 1996-97 वर्षी इयत्ता दहावी वर्गात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या या स्नेह संमेलन कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून केशव जगदाळे, एस के सातपुते, शेषेराव रेंगे, तसेच विशेष निमंत्रणक तात्याबा कांबळे आदी शिक्षक उपस्थित होते. यावेळी शिक्षक वृंद यांच्या हस्ते सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन केले. माजी विद्यार्थ्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा देत एकत्रित येऊन तब्बल 28 वर्षानंतर एक दिवसीय शाळा भरून बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. या सर्वांची खुशाली विचारण्यातच प्रत्येकजण मग्न दिसत होता. काही विद्यार्थी तर पुणे, मुंबई, गोवा,बार्शी, कळंब,सारख्या शहरातून या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले होते. तर काही विद्यार्थी स्थानिकचे होते. या कार्यक्रमात विचारांची देवाणघेवाण करण्यात आली. विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना माजी विद्यार्थ्यांचा परिचय देताना वर्गातील माजी विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, नोकरी,उद्योजक,व्ययसाय, शेतकरी कामगार म्हणून आपला ठसा उमटवला असल्याचे सांगितले असून या शाळेचे विद्यार्थी विविध क्षेत्रांत अग्रेसर असल्याचे कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसून आले.