तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील पंचरंग प्रतिष्ठानच्या वतीने परिसरातील युवा पिढीला व्यक्तिमत्व विकासाच्या माध्यमातून प्रेरणा देण्यासाठी इयत्ता 5 ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी दि. 21 ते 24 मे दरम्यान चार दिवशीय व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अभिनेते, नाट्यदिग्दर्शक, लेखक तुषार भद्रे - सातारा, नाट्य सिनेअभिनेता संदीप पाठक, प्रा. डॉ. संजय पाटील- देवळाणकर (विभाग प्रमुख नाट्यशास्त्र के. एस. के. महाविद्यालय बीड तथा परीनिरीक्षण मंडळ सदस्य महाराष्ट्र शासन) हे उपस्थित राहणार आहेत. सदर व्यक्तिमत्व विकास शिबीर हे तुळजापूर येथील हॉटेल स्कायलँड येथील सभागृहात घेण्यात येणार आहे. शिबिराचा इच्छुकांनी लाभ घेण्याचे आवाहन पंचरंग प्रतिष्ठानच्या वतीने समन्वयक प्रशांत शेटे, ॲड. दत्तात्रय घोडके, डॉ. शिवाजी जेटीथोर, ॲड.अक्षय जाधव यांनी केले आहे.

 
Top