तेर (प्रतिनिधी)- जागतिक वस्तू संग्रहालय दिनानिमित्त धाराशिव तालुक्यातील तेर येथील कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालयात प्रेक्षकांना 18 में ला मोफत प्रवेश देण्यात आला. धाराशिव तालुक्यातील तेर येथे राज्य सरकारच्या पुरातत्व व वस्तूसंग्रहालयाचे कै. रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू असून या संग्रहालयात सातवाहन काळातील पुरातन वस्तू पहाण्यासाठी देश, परदेशातील पर्यटन, अभ्यासक येत असतात. 18 मे जागतिक वस्तू संग्रहालयदिन असल्याने संग्रहालयात प्रेक्षकांना मोफत प्रवेश देण्यात आला. जागतिक वस्तू संग्रहालय दिनानिमित्ताने कै.रामलिंगप्पा लामतुरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी किसन काळे, अविनाश राठोड, सलमान पठाण, सविता बागडे, गिरीश चौवरे आदी कर्मचारी उपस्थित होते.