तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपअभियंता जाधव यांची प्रशासकीय चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी अमीर शेख यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन केली.

निवेदनात म्हटले आहे कि, आपल्या जिल्हयात जलजीवन मिशन योजने अंतर्गत मोठया प्रमाणात कामे चालू आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने बऱ्याच योजनेमध्ये पाण्याचे उदभव निवडताना सर्व्हे करणाऱ्या यंत्रणेला हाताशी धरुन दूर-दूरचे उदभव निवडलेले आहेत. ठेकेदार व अधिकारी यांना लाभ होईल याच पध्दतीने योजना राबविल्या जात आहेत. अधिकारी नियम डावलून कारभार करत आहेत  उपअभियंता जाधव दिनांक मे 2025 रोजी  आपसिंगा ता. तुळजापूर येथील घाटामध्ये पाईलाईन टाकण्याचे काम चालू असताना एक फुटावरच मेन लाईन टाकली जात होती. याची कल्पना मी 17/4/2025 रोजी जिल्हाधिकारी यांना आपणास फोन करुन काम निकृष्ठ होत असल्याचे कळविले होते. आपसिंगा घाटामध्ये दोन दिवसामध्ये फातूर-मातूर खोदकाम करुन पाईपलाईन टाकली जात होती. ते काम थांबवून जिल्हाधिकारी साहेब आपण सुचना केल्यामुळे दि. 17/4/20225 पासून आजतागायत त्या ठिकाणी पोकलेन व जे.सी.बी. ने खोदकाम सुरु आहे व घाटातील काम आपल्या सूचनेप्रमाणे  करावे लागले. त्यांच्या दोन मशिनी याच कामासाठी चालल्या आहेत. याचाही राग जाधव यांच्या मनात होता. तसेच दि. 23/04/2025 रोजी मी मंत्रालय येथे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे विशेष कार्य अधिकारी गणेश तसेच याविषयी चौकशी होईपर्यंत जाधव यांना त्यांच्या प्रभारी उपअभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग, धाराशिव या पदापासून दूर ठेवण्यात यावे. त्यांच्या ताब्यातील मोजमाप पुस्तिका व इतर आवश्यक कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ताब्यात घ्यावे व लवकरात लवकर चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करावी. अन्यथा नाविलाजास्तव आपल्या कार्यालयासमोर आंदोलन, उपोषण केले जाईल. याची कृपया नोंद घ्यावी. असे निवेदनात अमीर शेख आपसिंगा यांनी म्हटले आहे.

 
Top