तुळजापूर (प्रतिनिधी)- ई- रेकॉर्डस हा प्रकल्प राज्याचा महत्वकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पांतर्गत महसूल विभागाच्या अधिनस्त असलेले तहसिल कार्यालयातील फेरफार, सातबारा, ८ अ, खासरा पाहणी पत्रक, खासरा पत्रक, जुने पाहणी पत्रक, तसेच कुळ रजिष्टर तसेच भूमी अभिलेख विभागातील सर्व जुन्या अभिलेखाचे स्कॅनिंग व त्यानुसार डिजीटायझेशन करण्याची कार्यवाही आली आहे. सदर सर्व जुने अभिलेख हे Digitised स्वरुपामध्ये नागरिकांना ई- सर्व सुविधेदवारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. स्कॅनिंग केलेल्या अभिलेखांची तपासणी/पडताळणी झाल्यानंतर या अभिलेखांचे Bulk Singing करून असे अभिलेख डिजीटली साइन्ड स्वरुपामध्ये https://dharashiv.maharashtra.gov.in/erecord/ पोर्टलवरतील नागरिकांना उपलबध करून देण्यात आलेले आहेत.
सदर पोर्टलवर वर नमुद सर्व अभिलेख ई-सुविधेदवारे स्वतः नोंदणी करून तसेच मोबाईल OTP अभिलेख पाहण्यास उपलब्ध आहेत. सदरील अभिलेखाची Digitally signed प्रत हवी पोर्टल नियमानुसार ऑनलाईन पेमेंट अदा करून अभिलेख हस्तगत करता येतील. तरी नागरीकांना सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन शोभा जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी, यांनी केले आहे.