तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरणी शुक्रवार दि. 16 मे रोजी दुपारी कामठा येथे शरद जमदाडे यांना तपास अधिकारी यांनी दुपारी ताब्यात घेतले. तब्बल दीड महिन्यानंतर रणजित पाटील व त्यानंतर शरद जमदाडे या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
तुळजापूर ड्रग्ज तस्करीत 36 आरोपी असुन 16 जणांना अटक केली असून, 20 जण फरार आहेत. अटकेतील 15 पैकी 14 जण जेलमध्ये तर 1 जण पोलिस कोठडीत आहे. शरद जमदाडे हे पंचायत समितीचे माजी उपसभापती आहेत. तुळजापूर ड्रग्ज तस्करीत पोलिस एक- एक जणाचा मार्गावर राहुन त्यांना ताब्यात घेत आहेत. उर्वरीत आरोपींचा शोध चालु असुन ते लवकरच हाती येतील अशी माहीती नळदुर्ग पोलिस स्टेशन पीआय तथा तपास अधिक अधिकारी गोपाळ ठाकुर यांनी दिली.