तुळजापूर (प्रतिनिधी)- आजच्या तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या युगात पंचरंग प्रतिष्ठान परिसरातील युवा पिढीला व्यक्तिमत्व विकासाच्या माध्यमातून प्रेरणा देण्यासाठी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास शिबिर आयोजित केले
यात विद्यार्थ्यांना संभाषण कौशल्य आणि आवाजाची जोपासना, आत्मविश्वासाने बोलण्याची कला,सामाजिक संवाद आणि नेतृत्व,समाजात प्रभावीपणे वापरायचे धडे, वैयक्तिक विकास यामध्ये शालेय अभ्यास ह्या पलीकडे जीवन कौशल्याचा विकास याबाबत मार्गदर्शन होणार आहे. या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. तुषार भद्रे सातारा (अभिनेते, नाट्यदिग्दर्शक,लेखक) श्री.संदीप पाठक (प्रख्यात नाट्य सिनेअभिनेता ) आणि प्रा. डॉ. संजय पाटील- देवळाणकर (विभाग प्रमुख नाट्यशास्त्र, के एस के महाविद्यालय बीड तथा परीनिरीक्षण मंडळ सदस्य महाराष्ट्र शासन,मुंबई) लाभलेले आहेत.
सदर व्यक्तिमत्व विकास शिबिर हे तुळजापूर येथील हॉटेल स्कायलँड तुळजापूर वातानुकूलित सभागृहामध्ये दिनांक 21 मे 2025 ते 24 मे 2025 वेळ सकाळी 10:00 ते 5:00 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे. यामध्ये पंचरंग प्रतिष्ठानच्या वतीने भोजनाची, अल्पोपहाराची इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे.
या शिबिरामध्ये प्रवेशाची मर्यादा केवळ 75 जागा इतकी आहे. तरी याचा लाभ घेण्याचे आवाहन पंचरंग प्रतिष्ठानच्या वतीने सदर व्यक्तिमत्व विकास शिबिराचे समन्वयक श्री. प्रशांत शेटे, ऍड. दत्तात्रय घोडके,प्रा. डॉ.शिवाजी जेटीथोर,ऍड.अक्षय जाधव यांनी केले.