भूम (प्रतिनिधी)-  भूम येथील रहिवासी सध्या पुणे येथे वास्तव्यास असणारा सागर नंदकिशोर होगाडे याची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन द्वारा आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 या पर्वासाठी पुणेरी बाप्पा या संघात निवड झाली आहे. 

सागर हा गेल्या 7 ते 8 वर्षांपासून पुणे येथे क्रिकेटची तयारी करत आहे. तो जलदगती गोलंदाज म्हणून अनेक क्रिकेट स्पर्धा गाजवत आहे. गेल्या 3 वर्षांचा त्याचा उंचावता आलेख पाहून त्याची पुणेरी बाप्पा या संघात निवड झाली आहे. तसेच तो भारतीय थ्रो बॉल संघाचा देखील कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने थ्रो बॉल प्रकारात सुवर्ण, रजत व कांस्य पदक देखील पटकावले आहेत. थ्रो बॉल व क्रिकेट या दोन्ही क्रीडा प्रकारात त्याचे वर्चस्व असून सध्या क्रिकेटपटू म्हणून त्याची कारकीर्द बहरत आहे. 2023 पासून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात येत आहे. पुणेरी बाप्पा या संघाचे नेतृत्व भारताच्या संघाकडून क्रिकेट खेळणारा ऋतुराज गायकवाड करत आहे. 

 
Top