धाराशिव (प्रतिनिधी)- पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून 'फिजिक्स वाला' या उपक्रमाचे कौतुक केले आहे. यावेळी तहसीलदार मृणाल जाधव, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील, सरचिटणीस प्रेमा सुधीर पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना तहसीलदार मृणाल जाधव यांनी विद्यार्थ्यांनी कमी गुण व अपयशाने खचून न जाता ध्येय ठेवून फिजिक्स वाला सारख्या उपक्रमाचा फायदा करून घ्यावा असे सांगितले. कार्यक्रमांमध्ये फिजिक्स वालाचे अजय चौहान यांनी फिजिक्स वाला ची वाटचाल, क्लासरूम, रिकॉर्डिंग, पी डब्ल्यू ॲप, स्टडी मटेरियल याविषयी माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांचे कष्ट, शिक्षकांचे कष्ट व स्टडी मटेरियल हेच त्यांच्या यशाचे कारण सांगितले. प्रास्ताविकामध्ये सुधीर पाटील यांनी फिजिक्स वालाच्या माध्यमातून अभियंत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी म्हणजे नीट व जेईई साठी असलेल्या प्रवेश पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी दिल्ली किंवा कोटा या ठिकाणी जाण्याची गरज उरणार नाही. फिजिक्स वालाच्या माध्यमातून आपल्याला 'धाराशिव पॅटर्न' सुरू करायचा आहे असेही प्रतिपादन त्यांनी केले.
त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक संजय जाधव व इतर मान्यवरांच्या हस्ते एस.एस.सी बोर्ड परीक्षेत 90% पेक्षा अधिक गुण घेऊन विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यालयातील 173 विद्यार्थ्यांसह विद्यालयात 100% टक्के गुण घेऊन राज्यात प्रथम आलेल्या श्रावणी जयप्रकाश पवार व श्रेयस लालासाहेब पवार, जिल्ह्यातील इतर शाळांमधील गुणवंतांचाही सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभासाठी व फिजिक्स वालाच्या उद्घाटनासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, उप शिक्षणाधिकारी लांडगे तसेच 'फिजिक्स वाला' चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक एस. के. कापसे व एस. सी. पाटील यांनी केले. तर आभार प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांनी मानले.