तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील तामलवाडी येथे साजरा करण्यात येणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सव समीतीच्या अध्यक्षपदी अजय गायकवाड, उपाध्यक्षपदी अनंत भोजने, ओम जगताप तर सचिवपदी सुर्यकांत पाटील यांची निवड करण्यात आली.

दि.14 मे ते 19 मे दरम्यान शंभुराजे प्रतिष्ठान यांच्या वतीने साजरा करण्यात येणार्या शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त शिवरत्न नगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीरात दि.10 मे रोजी बैठक घेण्यात आली. यावेळी यंदाच्या वर्षी साजरा करण्यात येणार्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सव समीतीचे गठण करण्यात आले. यामध्ये अध्यक्षपदी अजय गायकवाड, उपाध्यक्षपदी अनंत भोजने,ओम जगताप तर सचिवपदी सुर्यकांत पाटील, खजिनदार किरण माळी तर लेझीम प्रमुख व मिरवणूक प्रमुखपदी महेश पाटील,राम करंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असुन 14 मे रोजी सकाळी शंभुराजे यांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. तर दि.19 मे रोजी सायंकाळी 6 वाजता सवाद्य, लेझीमच्या लयबद्ध तालात भव्य मिरवणूक काढण्यात येणारअसल्याचे यावेळी अध्यक्ष अजय गायकवाड यांनी सांगितले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यास तामलवाडी येथील सर्व शिवप्रेमी,शंभुप्रेमींनी उपस्थित राहुन हा शिवपुत्र शंभूराजे यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असेही अध्यक्ष अजय गायकवाड यांनी सांगितले. या बैठकीसाठी विविध मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शंभुराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top