कळंब (प्रतिनिधी)-  व्हिएतनाम येथे २७ मे २०२५ ते २ जून २०२५ दरम्यान आग्रोवन ने आयोजित केलेल्या शेतकरी अभ्यास दौ-यासाठी येथील वरिष्ठ बालरोगतज्ञ तथा प्रयोगशील शेतकरी डॉ रामकृष्ण लोंढे यांची निवड झाली आहे. 

संपूर्ण महाराष्ट्रातून ३० शेतकरी/ उद्योजक/ शास्त्रज्ञ निवडले गेले असुन या काळात ते विविध ठिकाणी भेटी देऊन तेथील शेतीसंबंधी माहिती जाणून घेणार आहोत. त्यामध्ये शेतीची भौगोलिक परिस्थिती, पीक पद्धती, सिंचनाची सुविधा, स्वयंचलित शेती ( आटोमायझेशन) ,शेती मध्ये ए आय चा वापर, शेतीमालावर प्रक्रिया ( फूड प्रोसेसिंग) उद्योग, फळांचे काप व भाज्यांचे निर्जलीकरण, हवा विरहित पॅकिंग ( व्हॉक्युम), चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज च्या प्रतिनिधी बरोबर वार्तालाप. तेथील समुह शेती, शासनाचे शेतीविषयक धोरण, पॅकेजिंग व निर्यातीच्या संधी बरोबरच तेथील पर्यटन, संस्कृती, ईतिहास, खाद्यसंस्कृती ई चा अनुभव घेणार आहेत. 

व्हिएतनाम मधील शेतकरी आपल्या सारखेच अल्प व अत्याल्प भूधारक असुन दीड ते दोन एकर जमीन धारक असुन देखील त्या देशाने पिक पद्धतीत अमुलाग्र बदल करून प्रक्रिया उद्योग उभारले व मालाची निर्यात वाढवली आणि त्या माध्यमातून प्रचंड झेप घेतली आहे. त्यातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखे आहे. व्हिएतनाम ची ओळख पर्यावरण पुरक शेती, आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून आपल्या संस्कृतीचे जतन करण्यात दिसून येते. 

रेडी टू कुक आणि रेड टू ईट या तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिएतनाम सद्या अग्रगण्य देशात गणला जाऊ लागला आहे. तेथील शैक्षणिक सुधारणा,आरोग्य सेवा, व्यवस्थापनात महिलांचा सहभाग व ग्रामीण विकास क्षेत्रात देखील त्यांनी भरीव प्रगती केली आहे. या दौ-या दरम्यान ते तेथील काही निवडक व ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळाना भेटी पण देणार आहेत. 

अभ्यास दौ-यासाठी आग्रोवन टिम च्या प्रमुख श्रीमती धनश्री शुक्ल मॅडम, शिखर बॅंकेचे प्रशासक श्री विद्याधर आनास्कर साहेब, समन्वयक गजानन शिंदे व गणेश मोरे यांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे. 

या अभ्यास दौ-यासाठी निवड झाल्याबद्दल आमदार कैलास दादा पाटील, कृषी क्षेत्रातील मान्यवर कृषी रत्न श्री बी बी ठोंबरे साहेब, कृषी भुषण श्री पांडुरंग आबा आवाड, धाराशिव जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी श्री रविंद्र माने, कळंब कृषी अधिकारी श्री भागवत सरडे, कृषी मंडलाधिकारी भुजंग लोकरे, कळंब डॉक्टर्स परिवार, रोटरी व इनरव्हिल परिवार, रोटरी चे नियोजित प्रांतपाल रो सुधीर लातुरे, माजी प्रांतपाल रो साळुंखे दादा,  उद्योग भारतीचे प्रविण काळे, शेतीनिष्ट शेतकरी बभ्रुवाहन कणसे, नारायण भिसे, भागवत ठोंबरे, समाधान तपसे, गणेश थोरात, अतुल सलगर, बाळकृष्ण भवर, सतिश टोणगे,दिलीप गंभीरे, उन्मेष पाटील,विलास मुळीक, सुरेश भाऊ जंत्रे, इ नी अभिनंदन करुन अभ्यास दौ-यासाठी शुभेच्छा दिल्या.

 
Top