धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात ओबीसी नेते छगन भुजबळ यांची निवड झाल्याबद्दल धाराशिव येथे आज (दि.20) महात्मा फुले समता परिषद व ओबीसी समाजाच्या वतीने मोठा जल्लोष करण्यात आला. श्री.भुजबळ यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्याचे वृत्त धडकताच शहरातील महात्मा फुले चौकात ओबीसी समाजाच्या वतीने जोरदार घोषणा, फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण, पेढे वाटून या निवडीचे स्वागत करण्यात आले.

यावेळी बोलताना महात्मा फुले समता परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष आबासाहेब खोत म्हणाले की, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांनी मंत्री पदाची शपथ घेतली, हा दिवस तमाम ओबीसी बांधवांसाठी आनंदाचा दिवस आहे. ओबीसी समाजाच्या प्रश्नासाठी रात्रंदिवस झटणारे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळाली याचा तमाम ओबीसी बांधवांना अभिमान आहे. म्हणून धाराशिव जिल्ह्यात महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आम्ही जल्लोष साजरा केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महात्मा फुले महात्मा फुले समता परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष आबासाहेब खोत, जिल्हाध्यक्ष बिभीषण खुणे, तालुकाध्यक्ष रॉबिन बगाडे, धाराशिव शहराध्यक्ष व्यंकट जाधव, कळंब तालुकाध्यक्ष प्रशांत वेदपाठक, शरणाप्पा घोडके, महादेव माळी, दत्ता कटारे, रामदास गायकवाड, सचिन मोरे, सचिन चौधरी, फयाज शेख, सुनील गवळी, लक्ष्मण वाघमारे, सुरेश लोकरे, नागेश चौधरी, नंदु कुऱ्हाडे यांच्यासह ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top