तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आणखी एका फरारी आरोपीला ठाणे जिल्हयातुन बदनापुर तालुक्यातील वागंणी येथुन अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. नानासाहेब अण्णासाहेब कुऱ्हाडे तुळजापूर यास अटक करण्यात आली आहे. या अटकेमुळे या प्रकरणातील एकूण
अटक आरोपींची संख्या 18 झाली असून, 18 आरोपी अद्यापही फरार आहेत.
आरोपींच्या शोधार्थ पोलिसांची विविध पथके फिरत आहेत. एकाच आठवड्यात माजी उपसभापती शरद जमदाडे कामठा आणि त्यानंतर माजी नगराध्यक्षांचा भाचा आबासाहेब पवार तुळजापूर यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता नानासाहेब कुऱ्हाडे याला सोमवारी रात्री उशिरा वांगणी येथून ताब्यात घेतले.