तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ मंगळवार दि. 20 मे रोजी प्रचंड गर्दी केली होती. देविचा वार मंगळवार लग्नतिथी, उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर आज भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पहाटे पासुन चालु असलेला भाविकांचा राञी पर्यत चालू होता. आज भाविकांनी साडीचोळी दहीदुधपंचामृत अभिषेक पुजा भोगी पुजा गोंधळ जावळ दंडवत पुरणावरणाचा नैवध माळपरडी घेणे पीठमीठाने  परड्या भरणे यासह अनेक धार्मिक विधी सहकुंटुंब मनोभावे केले.

मंगळवारी सुमारे लाखभर भाविकांनी श्रीतुळजाभवानी मातेच्या दर्शनाचा लाभ घातला. मंगळवार पहाटे एक वाजता चरणतिर्थ होवुन दर्शनार्थ आरंभ झाला पहाटे पासुन भाविकांनी मंदीरात गर्दी केली होती. सकाळ नंतर भाविकांचा ओघा वाढल्यानंतर सर्व रांगा भक्तांनी भरून गेल्या होत्या. आज भाविकांनी विविध  धार्मिक  विधी मनोभावे केले. देविदर्शना नंतर भाविकांनी बाजारपेठेत गर्दी केल्याने दिवसभर भाविकांनी बहरुन गेली होती. राञी मंदीर प्रांगणात छबिना काढल्यानंतर  प्रक्षाळ पुजा होवुन देवि मंदीराचे दरवाजे बंद करण्यात आले.

 
Top