भूम (प्रतिनिधी)- भुम नगरपरिषदेच्या सफाई कामगाराची मुलगी धाराशिव जिल्ह्यातून इयत्ता बारावी कला शाखेतून प्रथम क्रमाकाने उत्तीर्ण झाले आहे .येथील नगरपरिषद मधील सफाई कामगार शब्बीर शेख मुलगी सानिया शब्बीर शेख शंकरराव पाटील महाविद्यालयातील त्याला शाखेमधील बारावीची विद्यार्थिनी हिने कला शाखेतून जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. याबद्दल भूम येथील शंकरराव पाटील महाविद्यालयात सानिया शेख हिचा कुटुंबीय समवेत सत्कार करण्यात आला. 

सानियाने इयत्ता दहावी मध्ये अभ्यास करून 92 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली. तिने पुढे कला शाखा निवडली. कला शाखेचा जिद्दीने अभ्यास करून 87 .83 टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. शेख यांची हलाखीची परिस्थिती असताना त्यांनी मुलीला शिकवण्यासाठी भरपूर कष्ट घेत आहेत. बारावीचा निकाल लागल्यानंतर सानियाने कला शाखेतून जिल्हाभरातून प्रथम येण्याचा मान मिळवला. सानियाने वडिलांनी शिक्षणासाठी दिलेल्या सामर्थ्याचे सोने करून दाखवले आहे.

 
Top