भूम (प्रतिनिधी)- विद्यार्थिनीचा मोबाईल द्वारे सतत मेसेज पाठवून विनयभंग केल्याच्या आरोपातून शिक्षकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

थोडक्यात वृत्त असे की, अंतरगाव येथील विद्यालयातील विद्यार्थिनी हिचा सतत मोबाईलद्वारे स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम आणि विविध सोशल माध्यमातून  मेसेज पाठवून विनयभंग केल्याची तक्रार पीडित मुलीने परंडा पोलीस स्टेशन येथे दिनांक 9. 9. 2024 रोजी दिलेली होती. सदर तक्राची दखल घेऊन आरोपी शिक्षकाविरुद्ध परंडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 186/2024 कलम 75,78 भारतीय न्याय संहिता तसेच कलम 12 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण करून परंडा पोलिसांनी परंडा येथील विशेष सत्र न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते. सदरील प्रकरणाची सुनावणी परंडा येथील विशेष सत्र न्यायालय मध्ये पूर्ण झाली. सदर प्रकरणांमध्ये आरोपी तर्फे ॲड. सिराज मोगल यांचा युक्तिवाद आणि बचाव गृहीत धरून आरोपी धनंजय शिंदे याची विद्यार्थिनीचा मोबाईलवर सतत मेसेज पाठवून विनयभंग केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. सदर प्रकरणांमध्ये आरोपी तर्फे ॲड. सिराज मोगल यांनी काम पाहिले. तर त्यांना ॲड. सोहेल शेख, ॲड.ज्ञानेश्वर लोखंडे, ॲड.तोफिक शेख, ॲड. सतीश कालवडकर आणि ॲड. हुसेन सय्यद आणि मोहम्मद अली जमादार यांनी सहकार्य केले.


 
Top