तुळजापूर (प्रतिनिधी)- राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज सकाळी कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवींची अभिषेक पूजा केली. मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनाला आले होते.
श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनाने आत्मिक समाधान मिळाल्याच्या भावना यावेळी कदम यांनी व्यक्त केल्या. मंदिर संस्थानच्या वतीने गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा व कवड्याची माळ भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले, जनसंपर्क अधिकारी गणेश निर्वळ, सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम, सहायक जनसंपर्क अधिकारी अभिजीत तेरखेडकर, सहायक सुरक्षा निरीक्षक श्रीकांत पवार, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम-परमेश्वर व मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.