तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील अणदूर येथे दिनांक 1 जून रविवार रोजी सोसायटी फॉर वेलबिईग अवेअरनेस अँण्ड रिहॅबिलीटेशन, लातूर यांच्या सहकार्याने तालुक्यातील हॅलो मेडिकल फाउंडेशन यांच्या वतीने तालुक्यात प्रथमच रविवार दि.1 जून रोजी अणदूर येथे व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचे स्थापन केले असून याचे उद्घाटन लेखक अभिनेता व नाट्य कलाकार तसेच सामाजिक कार्यकर्ते अतुल पेठे यांच्या हस्ते हँलो मेडीकल फाऊंडेशन उमरगा-सोलापूर महामार्ग अणदुर येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सतीश हरिदास व डॉ. धनंजय चाकूरकर हे उपस्थित राहतील. गरजूंनी आवश्यक उपस्थित राहावे. अशी आवाहन हॅलो मेडिकल फाउंडेशन यांचे अध्यक्ष डॉ. शुभांगी अहंकारी तसेच डॉ. विजय गायकवाड, डॉ. मिलिंद पोतदार व डॉ. क्रांती रायमाने यांनी केले आहे.